मंडळाचा इतिहास. . .

मुख्य पान / इतिहास


खंडकर,पारखी,सोनटक्के,जपे,पंडित,वीरकर यांनी लावलेले गणॆशोत्सवाचे रोप वाढून विस्तारले आहे. टिळकनग़रातील बहुतांशी रहिवाशांचा मंडळाशी संपर्क आहे व ही आपलेपणाची भावना एका पिढीकडून दूसरीकडे हस्तांतरित झाल्याचे जाणवते.

प्रथमपासून भाद्रपदात दहा दिवसांसाठी साजरा होणारा उत्सव खंडकरांच्या घरशेजारी सुरवातीला बसवला गेला होता. मग तेथून सध्याच्या ओंकार सोसायटीच्या मोकळ्या जागेवर ताडपत्रीच्या मांडवात साजरा केला जाऊ लागला.

एक वर्ष परवानगी न मिळाल्यामुळे सध्याच्या सुदर्शन सोसायटीच्या मोकळ्या जागेत व तेथून लगेच श्री.पोंक्षे यांच्या घराजवळील मैदानात स्थलांतरीत झाला.मोकळ्या जागेवरील येणारी गंमत त्यानंतरच्या 11-12 वर्षात के.एन.कुलकर्णी व सुयोग मंगल कार्यालयात अपेक्षित उंची गाठू शकली नसली तरीतेथील काही फायदे काळाच्या ओघात जमेची बाजू ठरले.

सुरवातीच्या काळात मांडव व धार्मिक कामासाठी बहुतांश खर्चासाठी लागणारी रक्कम व वर्गणीपोटी जमणारी रक्कम ह्यात फारसा फरक नसल्याने शिल्लक अशी फारशी रहात नव्हती ही स्थिती साधारणत:85-86 सालापर्यंत रहात आली. त्यानंतर कार्यक्रमांच्या गुणवत्तेमुळे 92 पर्यंत थोडी थोडी सुधारणा होत गेली व 92-93 पासून मात्र मंडळाने आर्थिकबाजूने बाळसे धरायला सुरवात केली,ज्यासाठी मंडळाचा समाजाभिमूख़ द्रुष्टिकोन हे एक कारण आहे. ह्या ठिकाणी आवर्जुन नमुद करावेसे वाटते, नगरवासियांकडून श्री गणॆशोत्सवाच्या निमीत्ताने एकदाच वर्गणी गोळा केली जाते व त्यातूनच वर्षभराच्या उपक्रमांचे नियोजन केले जाते.आजच्या घटकेपर्यंत मंडळाचे कर्यकर्ते मिळालेल्या पैशाचा चोख हिशोब व योग्य विनीयोग व्हावा ह्यासाठी जागरूकतेने काळजी घेत आले आहेत व म्हणूनच नगरवासियांचा मंडळाबद्द्ल तेवढाच विश्वास रहात आला आहे.