मंडळाविषयी थोडक्यात. . .

मुख्य पान / मंडळाविषयी


१९५० साली नगरातील सर्वश्री खंडकर,पारखी,सोनटक्के,जपे,पंडित,विरकर व इतर समविचारी नगरवासियांनी एकत्र येऊन स्थापन केलेले गणेशोत्सव मंडळ नगरातील मोकळ्या जागांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत असे.मुंबईहून ताडपत्री भाडयाने आणून त्याचा मांडव बनवला जात असे.अनेक दिग्गज कलावंत व वक्ते या उत्सव सत्रांमध्ये सादरीकरण करून गेले.

दरवर्षी बसवलेली स्थानिक कलाकारांची नाटके तसेच कॅरम,चेस, व ब्रिज स्पर्धा प्रचंड लोकप्रिय होत्या.पहिल्या वर्षापासूनच अनंत चतुर्थीपर्यंत साजरा होणारा हा गणेशोत्सव १९९२-९३ पासून सुयोग मंगल कार्यालय क्र.२ येथे दिमाखात साजरा होत आहे.

१९९३ सालापर्यंत मंडळाचा कार्यकाळ हा फक्त दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यापुरताच मर्यादित होता,कार्यकर्ते उत्सवसत्राच्या अगोदर दोन महिने एकत्र येऊन वर्गणी गोळा करून मांडवातला गणेशोत्सव साजरा करत असत. पहिल्या पासूनच मंडळाचे नाव दर्जेदार कार्यक्रमासाठी डोंबिवलीत प्रसिद्ध होते.वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्ती व कलाकारांनी सादर केलेली भाषणे व करमणूकीचे कार्यक्रम हे जून्या डोंबिवलीकरांच्या आजही स्मरणात आहेत.

सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत मंडळाचे कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी एकत्रित येऊन मंडळाची सजावट साकारत असत,परंतु सुवर्णमहोत्सवी वर्षी मंडळातर्फे नगरातील पूर्वाश्रमीचे रहिवासी व प्रसिध्द श्री.संजय धबडे यांनी गणेशोत्सवात थायलंडच्या मंदीराची प्रतिकृती साकारली आणि त्यांची ख्याती संपूर्ण ठाणे जिल्यात झाली व त्यावर्षीपासूनच त्यांनी गणेशोत्सवात वेगवेगळ्या देशातील मंदिरांच्या किंवा वास्तूंच्या भव्य प्रतिकृती साकारल्या आहेत,ज्यामध्ये दाक्षिणात्य,चिनी,इजिप्शियन,रोमन,हिमाचल प्रदेश,नेपाळ येथील मंदीर संस्कृती,राजस्थानचा व परीसचा महाल,महाराष्ट्रातील लेणी शिल्प,गावाबाहेरचे जीर्ण मंदीर व समुद्राच्या तळातील सजावट,कंबोडियातील अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठे विष्णूचे मंदीर यांचा समावेश आहे. ह्या सर्व प्रतिकृती पाहण्यासाठी फक्त डोंबिवलीकरच नाही तर ठाणे ते बदलापूर पासून गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात.

उत्सावसत्रात मंडळातर्फे आयोजिण्यात येणारे प्रदर्शन ही पण डोंबिवलीकरांसाठी एक पर्वणीच असते.माजेस्टिक च्या पुस्तक प्रदर्शनाला उत्सावसत्रात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने सुरुवात झालेल्या या उपक्रमांत नंतर डोंबिवलीच्या लघुउद्योजक महिलांना वाजवी दरात स्टाल देऊन त्यांच्या उत्पादनांना वाव मिळवून देण्यासाठी तीन वर्षें आयोजिलेली ग्राहकपेठ,त्यानंतर डोंबिवलीतील पर्यटन क्षेत्राशी निगडीत संस्थांना एकत्रित आणून तीन वर्षे पर्यटन एक अनोखे दालन व मागील वर्षी साकारलेले सुंदर माझे घर हे गृहसजावटीवरील प्रदर्शन यांना डोंबिवलीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.